Image description
Free Page Rank Tool
Background image
Image description

हापूस आंबा

कोंकणातील मत्स्य - व्यवसाय

Background image
Image description

कोंकणातील होळी - शिमगोत्सव

Image description
Image description
Image description

कोंकणातील फणस


महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी ज्या फळाची उपमा कोकणी माणसाला दिली, ते फळ म्हणजे फणस. बाहेरून काटेरी पण आतून गोड असणारं हे फळ तसं बाकीच्या फळांच्या तुलनेत भारदस्त. महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोकणाचं हवामान या पिकाच्या वाढीसाठी पोषक असलं, तरीही उष्ण-दमट हवामान, मध्यम पाऊस आणि खोल व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत त्याची चांगली वाढ होऊ शकते. 


हे फळ म्हणजे अनेक छोट्या फळांचा (गरे) समूह असल्यानं त्याला संयुक्त फळ असं म्हणतात. गऱ्यांतील बियांना आठळ्या म्हणतात. आर्टोकार्पस हेटेरोफायलस (Artocarpus heterophyllus)  असं फणसाचं शास्त्रीय नाव आहे. 


फणसाचा फुले येण्याचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी, तर फळांचा हंगाम जून महिन्यापर्यंत असतो. फणसाच्या फळांचे कापा (कापता येण्याजोगे) आण बरका (रसाळ) असे दोन प्रमुख प्रकार असतात. ‘कापे गरे,खायला बरे’ असे म्हटले जाते. कारण ते खुसखुशीत, गोड चवीचे असतात, कापता येतात आणि त्यांची टिकवणक्षमताही चांगली असते. त्यामुळे ते विक्रीयोग्य असतात. बरके गरे मात्र तंतुमय आणि रसाळ असल्याने कापता येत नाहीत. त्यांचा स्वाद गोड पण काहीसा उग्र असतो. त्याचा उपयोग प्रामुख्याने फणसपोळी, सांजण यांसारखे प्रक्रिया पदार्थ करण्यासाठी केला जातो. पुढे वाचा...


कोंकणातील काजू

दर्‍याखोर्‍यातुन जाते माझ्या कोकणाची वाट
मला ओढुनिया नेते माझ्या दाराशी हि थेट


फणसासारखे मधुर इथल्या माणसांचे मन
राजापुरच्या गंगेमुळे भाविकही होती धन्य


कोकणात माझ्या निळा विस्तीर्ण सागर
मौज वाटे पाहण्यास मासोळ्यांचे सूर


लालबुंद या मातीत तांदुळ वरीची पिके
कोकणाचा हापुस आंबा अवघे जग जिंके


करवंद, जांभुळ, काजु हा तर कोकणी मेवा
निसर्गाने दिला जणु अनमोल ठेवा


पोटासाठी चाकरमानी मुंबईला जाई
परी शिमगा, गणपतीला परतुनी येई


माझ्या कोकणाची काय सांगु मी महती
दूर जाता कोकणासाठी डोळे पाणावती


हृग्वेधा विश्वासराव

कोकम / रातांबा / आमसूल

झाड: आमसूल कोंकणात फारच प्रसिद्ध आहे. हे एक नाजूक झाड असून याच्या फांद्या लोंबतात. याची पाने ५५ ते ८० मिलीमीटर लांब व २५ ते ३० मिलीमीटर रुंद असतात. पानाचा देठाकडील भाग गर्द हिरवा असतो तर टोका कडचा भाग हिरवा असतो. 

फुले: नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात याला फुले येतात. ही रसदार व गुलाबी रंगाची असतात. याचे झाडावर गुच्चे लागतात.

फळे: एका झाडाला साधारणपणे ६० ते ८० किलो फळे लागतात. एप्रिल व मे महिन्यात याची फळे पिकतात. लिंबाच्या आकाराच्या पिकलेल्या फळात ६ ते ८ बिया असतात. फळांना वास येतो व आंबट गोड चव असते. फळांपासून खाद्याम्ल व लाल रंग मिळतो. 

बिया: २० ते ३०% फळांचे वजन बियांत असते. बियातल्या गराचे वजन ६०% असते व गरात ४४% पर्यंत घट्ट तेल असते. ही झाडे समुद्र किनाऱ्यापासून घाटापर्यंतच्या प्रदेशात सर्वत्र वाढतात. याची सर्वात जास्त झाडे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. बेळगाव, उत्तर कर्नाटक तसेच केरळातही याची लागवड आढळते. खासी जंबिया टेकड्या व बंगाल, आसामातही हे आढळते. ६,००० फुटांपासून ते समुद्र सपाटीपर्यंत ही झाडे सर्वत्र आढळतात.


Image description

कोंकणची - विविधता

कोंकण शब्दात

Image description
Image description

सुरेल कोंकण

गोमू माहेरला जाते हो नाखवा

ग हिच्या घोवाला कोंकण दाखवा

 

दावा कोंकणची निळी निळी खाडी

दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी

भगवा अबोली फुलांचा ताटवा

ग हिच्या घोवाला कोंकण दाखवा

 

कोंकणची माणसं साधी भोळी

काळजात त्यांच्या भरली शहाळी

त्यांच्या काळजात भरली शहाळी

उंची माडांची जवळून मापवा

ग हिच्या घोवाला कोंकण दाखवा

 

सोडून दे रे खोड्या सा-या

शिडात शिर रे अवखळ वा-या

झणी धरणीला गलबत टेकवा

ग हिच्या घोवाला कोंकण दाखवा

होळीच्या बोंबा

 

होळीच्या बोंबा हा पण एक मस्त प्रकार असतो इकडे...
उदा....


हुरा रे हुरा, नि आमच्या ****(देवाचे नाव) ला सोन्याचा तुरा रे....... होलियोssssssssss (कोरस मध्ये)
अटकी रे अटकी, नि ***** वर आली रे पटकी (फटकी)..रे....... होलियोssssssssss (कोरस मध्ये)

नडला त्याला फोडला आणि नंतरची देवाक काळजी...!!!


"आयनाच्या बायना,

घेतल्याबिगर जायना
या या घराचा पोकल वासा
दे गे माय ढबू पैसा
हूऽऽऽ"


म्हणणारा संकासूर

कोंकणातील होळी - कोंकणातला शिमगोत्सव :-: फाल्गुन पंचमीपासून कोंकणात होळीला सुरुवात होते आणि सर्वजन लगबगीने कोंकणात जातात. सहकुटुंब सहपरिवार होळीच्या उत्सवात रमतात. घरासमोर छोटीशी होळी करून तिची पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेध्य होळीला अर्पण केला जातो. मग वाडीचा होम आणि नंतर गावाचा होम. नवीन जोडपी गावाच्या होमामध्ये नारळ अर्पण करतात. डोलाच्या तालावर मग गावदेवीची पालखी नाचवली जाते. सर्वजन गावदेवीच दर्शन घेवून घरी परतात. येताना लाडू, टोपी, फेफाटी घेवून येतात. गावात असतो फक्त आनंद आणि आनंद. उत्तर भारतात साजरा केला जाणारा रंगोत्सव म्हणजेच होलिकोत्सव हा महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने खास करुन कोकणात नि उर्वरित महाराष्ट्रात अग्नि पूजनाने साजरा केला जातो.अग्नि देवतेचे स्मरण,आभार नि वाईट -साईट गोष्टींचा निषेध, तसेच, त्याग ह्या सणाच्या निमित्ताने होळी मध्ये केला जातो.खास करुन माणसाच्या मना मध्ये सदैव जागृत असणाऱ्या अहंकाराची होळी ह्या निमित्ताने व्हावी असेच ह्या सणाचे प्रयोजन तर नसावे? कारण चढ़ाओढ़, मत्सर, हेवेदावे हे आजच्या जीवन शैलिचे अविभाज्य घटक बनू पाहत आहेत.चला आजच्या सणाच्या निमित्ताने त्याची आपण सर्वजण मिळून होळी करुयात.अहंकार,मत्सराच्या बैलाला घो...

कोंकणातील शिमगोत्सव आणि पालखी सोहळा :-: कोंकणातील पर्यटन व्यवसायाच्या वृद्धिसाठी तेथे विविध संस्था/संघटनांकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. सिंधुदुर्ग महोत्सव, दाभोळचा 'बॅक वॉटर', अनेक ठिकाणचे 'आंबा महोत्सव' आदी उपक्रमांच्या धतीर्वर 'शिमगोत्सवा'ला पर्यटनाची जोड देण्याची संकल्पना गेली काही वषेर् चचेर्त आहे. या सणाच्या कोकणातील नाविन्यपूर्ण वैविध्यतेचा 'पर्यटकां'ना आकषिर्त करण्यासाठी चांगला उपयोग करून घेता येईल. 

' गौरी गणपती'प्रमाणेच 'शिमगोत्सव' हा देखील कोकणातील एक उत्साही सण आहे. फाल्गुन महिन्यातील 'फाक पंचमी (शुद्ध पंचमी)'ला प्रारंभ होणारा हा सण पुढील दहा दिवस म्हणजे पौणिर्मेपर्यंत उत्तरोत्तर रंग भरत जातो. माडहोळी नाचत आणणे, रात्री होळी पेटविणे, नमनाचे खेळे, संकासूर, रोंबाट या साऱ्या 'शिमगोत्सवा'तील वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत. 'शिमगोत्सवा'च्या काळात कोकणातील बहुसंख्य गावांमध्ये ग्रामदेवतांच्या पालख्या सजविण्यात येतात. या पालख्या अगदी गुढी पाडव्यापर्यंत घरोघरी नेल्या जातात. ज्याला पालखी 'घर घेते' असे संबोधिले जाते. गावागावातून ठरलेल्या दिवशी या पालख्या रात्रीच्या वेळी 'वस्ती' करतात. त्याच रात्री या पालख्या ढोल ताशाच्या तालावर 'खेळविल्या' किंवा 'नाचविल्या' जातात. बेभानपणे चालणारा हा आनंदोत्सव सर्वत्र पहाटेपर्यंत सुरू असतो.  ताड, आंबा, काटे शेवर ही झाडे होळी म्हणून वापरतात. 

Image description
Image description
Image description
Image description
Image description
Image description

गणेशमय कोकण...

गणेशोत्सव आणि कोंकण हे समीकरण अगदी अतूट आहे. कोंकणातील सर्वात मोठा सण म्हणून या गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. नोकरी अथवा कामधंद्यासाठी मुंबई अथवा अन्यत्र असलेली कोकणातील प्रत्येक व्यक्ती न चुकता गणेशोत्सवात गावाकडे जातेच जाते. कोकणात गणेशाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातील काही जागृत व नवसाला पावणारी असल्याचे सांगितले जाते. घरच्या गणपतीबरोबर येथील प्रत्येकाला या गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय अजिबात चैन पडत नाही.

कोंकणात देवाला गार्‍हाणं घालण्याची रीत


चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजार्‍याकडून (भटजीकडून) गार्‍हाणं
घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते.पुजार्‍याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते. 


काही निवडक :-: 


बाप्पा मोर्याला गार्‍हाणं ......
हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर-पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गार्‍हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.
"होय म्हाराज्या"


हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊ दे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.
"होय म्हाराज्या"
 


शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा, तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास, आमका सगळ्याक, क्षमा कर.
"होय म्हाराज्या" 


श्रीकृष्ण सामंत

प्रवास नोंदवा सवलत मिळवा...

प्रवास नोंदवा सवलत मिळवा...

कोंकण असेही

Image description
Image description
Image description
Image description
Image description

कोंकण कलाक्षेत्र

Image description

अजरामर मराठी नाटक ‘वस्त्रहरण’


मालवणी नटसम्राट मच्छीँद्र कांबळी यांनी आपल्या दमदार अभिनयाने गाजविलेले, आणि मालवणी भाषेचा झेँडा सातासमुद्रापार पोहोचविणारे मालवणी नाटक वस्त्रहरण.

 ‘वस्त्रहरण’ मराठी नाटकांच्या इतिहासातलं एक मानाचं पान...मराठी मानबिंदू...मराठी रसिकांच्याच नव्हे तर मराठी कलावंतांच्याही जिव्हाळ्याचा खास विषय असलेलं..मराठी रंगभूमीवरचं एक दैदीप्यमान भरजरी लेणं... 

१६ फेब्रुवारी १९८० या दिवशी खग्रास ग्रहणाच्या मुहूर्तावर मच्छिंद्र कांबळी या कलावंतांनं आपलं स्वप्न रंगमंचावर आणलं. भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘वस्त्रहरण’ या मालवणी भाषेतल्या पहिल्यावहिल्या नाटकाचा रंगमंचावर उदय झाला. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणावर आधारित या फार्सिकल नाटकात तात्या सरपंचाच्या भूमिकेतील मच्छिंद्र कांबळी वगळता कुणीही कलाकार नावाजलेला नव्हता. मात्र या अद्भुत फार्सला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि ‘वस्त्रहरण’ च्या पदरी भरभरून दान टाकले. या नाटकाचे धुंवाधार प्रयोग सुरू झाले. अल्पावधीत या नाटकाने १०० चा आकडा ओलांडला आणि १७५ व्या प्रयोगाचे महाराष्ट्राचे लाडके सहित्यिक पु.लं.देशपांडे यांनी खास उपस्थिती लावली. पु.लं.नी या नाटकाचे वारेमाप कौतुक केल आणि ‘वस्त्रहरण’ची गाडी भरधाव वेगाने धावू लागली.

 या अजरामर नाटकाने मालवणी भाषेचा झेंडा विविध देशांत फडकवला. मराठी रसिकांना मालवणीची खास गोडी लावली आणि मालवणी नाटकांचा ओघ सातत्याने मराठी रंगमंचावर सुरू ठेवला. परंतु दुर्दैवाने ‘वस्त्रहरण’ ची यशाची घोडदौड सुरू असताना या नाटकाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र कांबळी यांनी कायमची एक्झिट घेतली. मात्र त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्रसाद कांबळी यांनी या नाटकाच्या पाच हजाराव्य प्रयोगाचे मच्छिंद्र कांबळी यांचे स्वप्न मराठी चित्रपट आणि नाट्य़ वर्तुळातील प्रसिद्ध कलावंतांना घेऊन पूर्ण केले. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, प्रशांत दामले, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, पंढरीनाथ कांबळे यांसारख्या कलावंतांनी ‘वस्त्रहरण’चा ५००० वा प्रयोग तितकाच गाजवला. मालवणी अभिनय सम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी मराठी रंगभूमीला दिलेलं हे जरतारी लेणं आहे.

कोंकणातील दशावतार

Image description